‘इ.व्ही.एम्.’मध्ये छेडछाड करून मताधिक्य घटवले !

अमोल कीर्तीकर यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार !

अमोल किर्तीकर आणि रवींद्र वायकर

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी ‘इ.व्ही.एम्.’ यंत्रामध्ये छेडछाड करून मताधिक्य घटवले, अशी तक्रार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे केली आहे. ‘मायक्रोप्रोसेसर आणि सॉफ्टवेअर लोडिंग युनिट’च्या ‘स्टोरेज’साठी निर्धारित केलेल्या कार्यपद्धतीचे पालन करण्यात आले नाही, असे अमोल कीर्तीकर यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकर यांचा ४८ मतांनी पराभव झाला. प्रारंभी मतमोजणीमध्ये अमोल कीर्तीकर हे काही मतांनी विजयी झाले होते; मात्र शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये रवींद्र वायकर यांना ४८ मताधिक्य मिळाले. त्यामुळे निवडणूक आयोगाने रवींद्र वायकर यांना विजयी घोषित केले.