सनातनच्या ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !’ या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे औषध सिद्ध केल्यावर घरातील झुरळांचे प्रमाण न्यून होणे

श्री. महेंद्र चंद्रकांत अहिरे

‘आमच्या घरात झुरळांचे प्रमाण पुष्कळ वाढले होते. अनेक उपाय करूनसुद्धा घरातील झुरळे न्यून होत नसत. रात्रीच्या वेळी ही झुरळे स्वयंपाकाची शेगडी आणि ओटा यांवर सर्वत्र फिरतांना दिसत असत. आम्ही बाजारात मिळणारी विविध औषधे, क्रिम, स्प्रे, खडू इत्यादी वापरून पाहिले; परंतु त्याचा फारसा परिणाम दिसत नव्हता. ‘घरात झुरळे होणे’, हे वाईट शक्तींच्या त्रासाचा भाग आहे’, असे मला समजले होते. त्यावरील उपायांचा विचार करत असतांना गुरुदेवांच्या कृपेने ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !’ या ग्रंथातील आधुनिक पशूवैद्य अजय जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे मी बोरिक पावडर, दूध पावडर, कणीक आणि कॉफी एकत्र करून त्या मिश्रणाचे गोळे प्रार्थना करून घरात सर्वत्र ठेवले. आश्चर्य म्हणजे एक आठवड्यातच झुरळांचे प्रमाण अल्प होतांना दिसले. पुढील १५ ते २० दिवसांत जवळजवळ सर्व झुरळे नष्ट झाली. विशेष म्हणजे घरात दिसणारी अतिशय लहान झुरळेही या औषधामुळे दिसेनाशी झाली. खरेतर, हे औषध करणे पुष्कळ सोपे, सहज शक्य आणि अल्प व्ययात होणारे आहे. त्याचप्रमाणे त्याचा परिणामसुद्धा बाजारातील औषधांपेक्षा अनेक पटींनी अधिक आहे. या औषधामुळे झुरळांची प्रजननक्षमता नष्ट होत असल्यामुळे घरात नवीन झुरळे निर्माण होत नाहीत. इतके सोपे औषध गुरुदेवांनी आम्हाला या ग्रंथाच्या माध्यमातून सहज उपलब्ध करून दिले. त्यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी आणि आधुनिक पशूवैद्य जोशी यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. महेंद्र चंद्रकांत अहिरे, भोर, पुणे. (९.४.२०२४)