Pakistan Congratulates  Modi  After 5 Days : पाकच्या पंतप्रधानांनी ५ दिवसांनी केले नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन !

शाहबाज शरीफ व नरेंद्र मोदी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – नरेंद्र मोदी यांनी ९ जून या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मुळात लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून या दिवशी लागून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार, हे स्पष्ट झाले होते. अमेरिका, रशिया आदी देशांनी मोदी यांचे अभिनंदनही केले होते; मात्र पाकच्या पंतप्रधानांनी ५ दिवसांनी अभिनंदन केले आहे. पंतप्रधान शरीफ यांना भारताकडून मोदी यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले नव्हते.

शपथविधी सोहळ्यापूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांना विचारले होते, ‘पाकिस्तानने पंतप्रधान मोदी यांचे तिसर्‍यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे का ?’ त्यावर त्या म्हणाल्या होत्या, ‘नव्या सरकारचा अद्याप अधिकृतपणे शपथविधी झालेला नाही. त्यामुळे भारतीय पंतप्रधानांचे अभिनंदन करण्याविषयी बोलणे अकाली ठरेल.’

संपादकीय भूमिका

पाककडून अन्य काय अपेक्षा करणार ?