Muslims Attack Hindus : ईदगाहाजवळील वटवृक्षाची पूजा करणार्‍या हिंदूंवर मुसलमानांकडून आक्रमण

  • मधुबनी (बिहार) येथील घटना

  • पोलिसांसह अनेक जण घायाळ

(ईदगाह म्हणजे नमाजपठणाची जागा)

प्रतिकात्मक छायाचित्र

मधुबनी (बिहार) – मधुबनी जिल्ह्यातील बसोपट्टीमधील कौहा गावामध्ये वट सावित्री पूजेचे व्रत केल्यानंतर पूजा करणार्‍या हिंदु महिला आणि पुरुष यांच्यावर धर्मांध मुसलमानांच्या जमावाने आक्रमण केल्याने १२ जण घायाळ झाले. घटनास्थळी पोलीस पोचल्यावर त्यांच्यावरही आक्रमण करण्यात आले. काही पोलीसही घायाळ झाले. सर्व घायाळांना रुग्णालयात भरती करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी येथे ध्वज संचलन केले.

येथील ईदगाहपासून अनुमाने ५० फूट अंतरावर एक जुने वटवृक्ष आहे, जिथे हिंदू प्राचीन काळापासून पूजा करत आहेत, तर मुसलमानही त्याला अनेक वर्षांपासून विरोध करत आहेत. या वेळीही जेव्हा हिंदूंनी पूजा करणे चालू केले, तेव्हा मुसलमानांनी विरोध करत नंतर आक्रमण केले. प्रशासनाने म्हणणे आहे की, ज्या भूमीवर हे वटवृक्ष उभे आहे, त्या भूमीची कागदपत्रे कुणाकडेच नाही.

संपादकीय भूमिका 

बिहारमध्ये भाजप युती सरकारमध्ये असतांना अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !