Russia Ukraine War : युक्रेनला शस्त्रे पुरवणार्‍या देशांच्या सीमेवर क्षेपणास्त्रे तैनात करू !

पुतिन यांची अमेरिका आणि युरोपीय देश यांना धमकी

सेंट पीटर्सबर्ग (रशिया) – युक्रेनला शस्त्रे पुरवणार्‍या देशांच्या सीमेवर क्षेपणास्त्रे तैनात करू, अशी धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिका आणि युरोपीय देश यांना दिली. युक्रेनमध्ये युद्ध चालू झाल्यापासून आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या वरिष्ठ संपादकांशी पुतिन यांची प्रथमच भेट झाली. त्या वेळी ते बोलत होते.

पुतिन पुढे म्हणाले, ‘‘रशिया कधीही अण्वस्त्रे वापरणार नाही’, हा पाश्‍चात्त्य देशांचा समज चुकीचा आहे. ‘नाटो’चे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी युक्रेनला रशियन प्रदेशावर आक्रमण करण्यासाठी पाश्‍चात्त्य शस्त्रे वापरण्याची अनुमती देण्याचे आवाहन केले. युक्रेनला रशियावर शक्तीशाली शस्त्रांसह आक्रमण करण्याची अनुमती देणे, ही गंभीर गोष्ट असून त्यांचे हे पाऊल अनेक देशांना युद्धाकडे नेणारे आहे.’’