मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात यंदाच्या निवडणुकीत १८ सभा घेतल्या होत्या; पण तरीही सत्ताधारी महायुतीचे अनेक उमेदवार पराभूत झाले. केवळ ५ जणच विजयी झाले. राज्यात विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीचाही जोर होता; पण मोदींच्या सभांमुळे वातावरण पालटण्याची शक्यता महायुतीला वाटत होती. प्रत्यक्षात वेगळेच घडले. मुंबईतही महायुतीचेच ६ उमेदवार निवडून येतील, असा पक्ष नेतृत्वाला ठाम विश्वास होता; मात्र चुरशीची लढाई होऊन महायुतीचा पराभव झाला.