विक्रोळी (मुंबई) येथील धर्मप्रेमी उद्योजक दीपक पंडित यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

पनवेल, ४ जून (वार्ता.) – विक्रोळी येथील प्रखर धर्माभिमानी, तसेच उद्योजक श्री. दीपक पंडित (सर) यांनी २५ मे या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. श्री. पंडित यांनी कार्यालयातील कर्मचार्‍यांसाठी कार्यालयात साधना सत्संग चालू केले आहेत. त्यांनी सनातनच्या आश्रमाला भेट देण्याचे ठरवले आणि कर्मचार्‍यांसह ते आश्रमात आले. या वेळी आश्रमातील साधक श्री. महेंद्र सहस्रबुद्धे यांनी आश्रमातील विविध विभागांची माहिती देऊन तेथे चालणार्‍या सेवांविषयी अवगत केले.

या वेळी सनातन संस्थेचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी श्री. पंडित आणि त्यांचे सहकारी यांना साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन अन् त्यांचे शंकानिरसन केले. आश्रमातील चैतन्यदायी वातावरण पाहून श्री. दीपक पंडित आणि त्यांचे सहकारी भारावून गेले.

अभिप्राय

  • श्री. दीपक पंडित : आश्रमातील साधकांच्या चेहर्‍यावर तेज आणि आश्रमात सकारात्मक ऊर्जा जाणवते. येथे ८ दिवस राहून सेवा-साधना शिकायला आवडेल.
  • सौ. माधुरी मावनी : प्रवासातून आल्यावर डोके पुष्कळ जड झाले होते. आश्रमात पोचल्यावर डोके शांत होऊन उत्साह जाणवला.