Madhubani  Maulavi Rapes Minor : मधुबानी (बिहार) येथे मदरशातील मौलवीकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

 पीडितेने घटनेची वाच्यता करू नये, यासाठी मौलवीने तिला कुराणची शपथ घातली

मधुबानी (बिहार) – बिहारमधील मधुबानी येथे मदरशातील एका मौलवीने (मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता) अल्पवयीन मुलीवर  बलात्कार केला. येथील मदरशातील  मौलवीने पीडित अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा बलात्कार केला. पीडित मुलगी ७ महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. आरोपी मौलवी पसार असून त्याला अटक करण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी धाडी घालत आहेत.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी शिकवणीवर्गासाठी मदरशात जायची. इतर मुले घरी गेल्यानंतर मौलवी तिला थांबवून घेऊन तिच्यावर बलात्कार करत असे. प्रत्येक वेळी तो तिला ठार मारण्याची धमकी देत असे. इतकेच नव्हे, तर तिने या घटनेची कुठेही वाच्यता करू नये यासाठी मौलवीने तिला कुराणची शपथ घातली होती. जेव्हा मुलगी ७ महिन्यांची गर्भवती झाली, तेव्हा हे प्रकरण उघड झाले. अल्लाहच्या भीतीमुळे पीडित मुलीने तिच्या पालकांना याविषयी सांगितले नाही. जेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती झाली, तेव्हा तिच्या आईने तिला प्रश्‍न विचारला. यानंतर तिने संपूर्ण घटना तिच्या आईला सांगितली. पीडित मुलीच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली.

गावातील लोकांनीच मदरशाला टाळे ठोकले !

सरकारी यंत्रणा काहीही करणार नाहीत, याची निश्‍चिती असल्याने आता जनताच चुकीची कृत्ये रोखण्यासाठी कृती करू लागली आहे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?

ही माहिती मिळताच गावातील लोक संतापले. त्यांनी मदरशाला टाळे ठोकले आणि मौलवीच्या विरोधात निदर्शने केली. मदरशामध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांनी मदरशाचे प्रमुख मौलवी कारी शाहनवाझ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर खुटोना पोलीस ठाण्यात कारी शाहनवाझच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • मदरशांमध्ये सतत घडणार्‍या अशा घटनांवरून ‘मदरसे म्हणजे वासनापूर्तीचे अड्डे’ असे चित्र निर्माण झाले आहे. याविषयी एकही मुसलमान नेता, पुरोगामी किंवा प्रसारमाध्यमे तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !
  • अशा आणखी किती घटना घडल्यावर सरकार मदरशांवर बंदी घालणार आहे ?
  • आधुनिकीकरणाच्या नावाखाली मदरशांना लाखो रुपयांचे अनुदान देणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकारे आणि केंद्र सरकार हे आता तरी मदरशांचे हे वास्तव लक्षात घेतील का ?