इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत सनातनच्या साधकांचे सुयश !

कु. कृष्ण आचार्य

मिरज – येथील सनातनचे साधक कु. कृष्ण राघवेंद्र आचार्य याने इयत्ता १० वीच्या परीक्षेत ८७.६० टक्के गुण प्राप्त केले आहेत. परीक्षा चालू असतांना त्याला परीक्षेचा ताण कधीच आला नाही. ‘हे यश गुरुदेवांच्या कृपेमुळे मिळाले आहे’, असा त्याचा भाव आहे.

कु. सुयोग कट्टी

पलूस (जिल्हा सांगली) – येथील सनातनचा साधक कु. सुयोग शैलेश कट्टी याने इयत्ता १० वीच्या परीक्षेत ८६.४० टक्के गुण प्राप्त केले आहेत. तो त्याच्या मित्रांना साधनेविषयी सांगतो. साधक आणि धर्मप्रेमी यांना सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, भित्तीपत्रके लावणे, हस्तपत्रके वाटप करणे या सेवा तो तळमळीने करतो.

पुणे – येथील सनातनचा साधक कु. समर्थ शैलेंद्र शिंदे याला १० वीच्या परीक्षेत ८५.६० टक्‍के गुण मिळाले आहेत. समर्थ हा सनातनचे साधक शैलेंद्र शिंदे यांचा मुलगा आहे. त्याला मिळालेल्या यशाविषयी कु. समर्थ म्हणाला की, मला इयत्ता आठवीमध्ये केवळ ४८ टक्के गुण होते. त्यानंतर मी प्रतिदिन सकाळी कुलदेवतेचा नामजप करायला प्रारंभ केला. त्यामुळे माझ्या मनाची चंचलता अल्प होऊन एकाग्रता वाढली. पेपर लिहितांना आरंभीला पेपराच्या भोवती मानसरित्या भगवान श्रीकृष्णाच्या नावाचे मंडल केले. एखाद्या प्रश्नाचे उत्तर आठवत नसल्यावर श्रीकृष्णाचा जप केल्यावर उत्तर आठवत होते.

पुणे – येथील सनातनची ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची साधिका कु. श्रेया वैभव मेढेकर हिला १० वीच्या परीक्षेत ८० टक्‍के गुण मिळाले आहेत. कु. श्रेया श्रीकृष्णाचा नामजप आणि प्रार्थना करते. कु. श्रेयाचे वडील श्री. वैभव मेढेकर यांनी सांगितले की, ती सेवा करण्यास तत्पर असते, तिला ‘देवच अभ्यास करवून घेत आहे’, असे वाटत होते.

सर्व विद्यार्थी साधकांनी या यशाचे श्रेय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केले आहे. सर्वांचा त्यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक