Pakistan Fawad Chaudhary : (म्हणे) ‘नरेंद्र मोदी यांचा पराभव होणे आवश्यक !’ – पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी

पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांचे मोदीद्वेषी विधान !

पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – नरेंद्र मोदी यांची विचारसरणी कट्टरतावादी आहे. त्यांचा पराभव होणे अत्यंत आवश्यक आहे. पाकिस्तानातील प्रत्येकाला नरेंद्र मोदी यांना  हरवायचे आहे. जो कुणी त्यांचा पराभव करेल, मग ते राहुल असोत, केजरीवाल असोत किंवा ममता बॅनर्जी असोत, आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत, असे विधान पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी केले आहे.

फवाद चौधरी पुढे म्हणाले की, भारत-पाकिस्तान संबंध तेव्हाच सुधारतील, जेव्हा दोन्ही देशांतील आतंकवादी अल्प होतील. पाकिस्तानातील सामान्य लोकांमध्ये भारताविषयी द्वेष नाही; पण भारतात रा.स्व. संघ आणि भाजप सतत पाकिस्तानविषयीचा द्वेष लोकांच्या मनात निर्माण करत आहेत. हे दोन्ही देशांच्या सामान्य जनतेसाठी चांगले नाही.

संपादकीय भूमिका

असे म्हटल्यामुळे मोदी यांचा पराभव होईल, या भ्रमात असणारे पाकचे नेते ! उलट ‘पाकचे तुकडे होवोत’, असे भारतीय म्हणत आहेत आणि लवकरच ते सत्यातही येणार आहे, याकडे पाकच्या नेत्यांनी लक्ष द्यावे !