सध्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीतील आरोप-प्रत्यारोपांच्या शृंखलेत अनेक गोष्टी समोर येत आहेत. अशीच एक महत्त्वाची वस्तूस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील एका प्रचारसभेत समोर आणली. त्यांनी ‘लव्ह जिहाद’चा आरंभ झारखंडमध्ये झाला आणि झारखंडनेच देशाला ‘लव्ह जिहाद’ हा शब्द दिला’, असे उघडपणे सांगितले. पंतप्रधानांनी स्वतः लव्ह जिहादचे अस्तित्व मान्य करणे आणि ‘लव्ह जिहाद’ असा शब्द उच्चारणे, याला मोठे महत्त्व आहे. साधारण २ दशकांपूर्वी जेव्हा ‘लव्ह जिहाद’ असे म्हणण्याचेही कुणाचे धाडस होत नव्हते, तेव्हापासून ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमधून लव्ह जिहादच्या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या. तेव्हा अनेकांना आमचे म्हणणे आततायीपणाचे वाटे; पण ‘सनातन प्रभात’ला हिंदु धर्मावरील या गंभीर संकटाविषयी पुरेपूर कल्पना होती; म्हणूनच कुणाचीही भीडभाड न बाळगता आम्ही या षड्यंत्राला वाचा फोडण्याचे काम निरंतर करत आलो आणि अद्यापही करत आहोत. दोन दशकांपूर्वी काँग्रेसची राजवट होती, तेव्हा अर्थातच ‘लव्ह जिहाद’ची नोंद घेतली गेली नाही. पुढे सरकार पालटले, तेव्हा एका ज्येष्ठ राजकारण्याने ‘कुठे आहे लव्ह जिहाद ?, मला कुठे दिसत नाही’, असे विधान करून त्याची खिल्ली उडवली होती. आता पंतप्रधानांनी स्वतःच ‘लव्ह जिहाद’ केवळ मान्यच केला असे नाही, तर त्याचे उगमस्थानही जनतेला सांगून टाकले. यामुळे या समस्येवर लवकरच उपाय काढला जाईल, याविषयी हिंदू प्रचंड आशावादी आहेत. मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधानपदाचा बहुमान मिळणे जवळपास निश्चित आहे, असे आजचे चित्र सांगते. त्यामुळे त्यांनी आता ‘तिसरी घंटा’ वाजवून लव्ह जिहादच्या विरोधात धडक कृती करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे; कारण ‘लव्ह जिहाद’ हे हिंदु धर्म संपवण्याचे अत्यंत पद्धतशीर आणि सुनियोजित कटकारस्थान आपल्या देशात उघडपणे चालू आहे. मोगल आक्रमकांपासून टिपू सुलतानपर्यंत सर्वांनी हिंदु स्त्रियांवर केलेले बलात्कार, हा त्या वेळचा लव्ह जिहादच होय ! एवढेच कशाला, अगदी अलीकडे, म्हणजे वर्ष १९८९ मध्ये काश्मीरमध्ये जिहाद्यांनी काश्मिरी हिंदु पुरुषांना धमकी दिली, ‘तुम्ही त्वरित काश्मीर सोडून जा; पण तुमच्या मुली अन् बायका यांना येथेच सोडा !’ हाही लव्ह जिहादच होता. हिंदु स्त्रियांना छळ, बळ, कपट, प्रलोभन, आमीष आदी कसेही करून स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, त्यांचे धर्मांतर करायचे, त्यांच्याशी निकाह करायचा, त्यांच्यापासून मुले होऊ देऊन स्वतःची लोकसंख्या वाढवायची आणि मग त्या हिंदु स्त्रियांना वाममार्गाला लावायचे किंवा आतंकवादी कृत्यांत जुंपायचे, अशी या लव्ह जिहादची ‘थिअरी’ आहे.
कायद्याला वाकुल्या !
मध्यंतरी याच लव्ह जिहादवर आधारित असलेल्या ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटामुळे ही समस्या पहिल्यांदा पडद्यावर आली. समाजात या चित्रपटामुळे नाही म्हटले, तरी मोठ्या प्रमाणात जागृती झाली. लव्ह जिहाद फोफावण्याला सर्वाधिक हातभार लावला, तो याच हिंदी चित्रपटसृष्टीने ! ९० च्या दशकातील चित्रपटांची सूची डोळ्यांसमोर आणल्यास लक्षात येईल की, चित्रपटाचा नायक मुसलमान, तर नायिका ही नेहमी हिंदूच असे. वास्तवातही आज अनेक मुसलमान कलाकारांच्या पत्नी या हिंदु आहेत. तथापि त्यांच्या मुलांची नावे मात्र हिंदु नाहीत ! हाच लव्ह जिहाद ! मध्यंतरी अशाच एका जोडप्याच्या मुलाचे नाव एका मुसलमान आक्रमकाच्या नावावरून ठेवल्याने मोठा गदारोळ झाला होता; पण त्या मुलाचे नाव आहे तसेच राहू देण्यात आले. लव्ह जिहाद हे एवढे मोठे षड्यंत्र आहे, ज्याची हिंदूंना अजूनही म्हणावी तशी कल्पना नाही. मुसलमान तरुणांना लव्ह जिहादसाठी पार्श्वभूमी निर्माण करून देण्यापासून या प्रकरणी ते कारागृहात गेलेच, तर त्यांना सोडवण्यापर्यंतची सर्व यंत्रणा जणू सिद्ध असते. पंतप्रधानांच्याच शब्दांत सांगायचे, तर ही एक सुनियोजित ‘इकोसिस्टीम’ आहे. लव्ह जिहादला विरोध करणार्या हिंदूंना खलनायक ठरवण्यापासून सर्वसामान्य हिंदूंच्या मनावर ‘प्रेमाला धार्मिक रंग नसतो’, असे बिंबवणारे याच ‘इकोसिस्टीम’चा भाग आहेत. एवढे करूनही जर लव्ह जिहाद्याला शिक्षा झालीच, तर ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असा अहवाल ‘इकोसिस्टीम’मधली महत्त्वाची कडी असलेली अमेरिका प्रसिद्ध करते. काही वर्षांपूर्वी हिंदु जनजागृती समितीने ‘लव्ह जिहाद’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले. यात सर्व गोष्टी तपशीलवार नमूद करण्यात आल्या असून अभ्यासपूर्ण आकडेवारीही देण्यात आली आहे. हे सर्व सांगायचे तात्पर्य एवढेच की, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदुत्वनिष्ठ प्रसारमाध्यमे आदी सर्व जण लव्ह जिहादच्या संकटाविषयी हिंदूंना जागृत करतच आहेत. तथापि लव्ह जिहादची दाहकता ठळकपणे समाजासमोर आली ती झारखंडमधील राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव प्रकरणातून ! पंतप्रधानांनी उल्लेख केलेले प्रकरण ते हेच ! या प्रकरणात रकीबुल हसन याने ‘रंजतसिंह कोहली’ असे हिंदु नाव धारण करून तारा सहदेव हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला होता. नंतर तिचा लैंगिक छळ आणि प्रचंड अत्याचार करत तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला होता. या सर्वांतून कशीबशी सुटका करून घेऊन तिने पोलीस ठाणे गाठले आणि तिच्यावरील अत्याचारांना वाचा फोडली. ऑक्टोबर २०२३ मध्ये रकीबुल हसन याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासह हसनची आई आणि अन्य एक साथीदार यांनाही अनुक्रमे १० अन् १५ वर्षांची शिक्षा झाली. ही शिक्षा एका प्रकरणात झाली, अशी सहस्रो प्रकरणे असावीत, जी अजून उघड होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. धर्मांध मुसलमानांमध्ये लव्ह जिहादचे बीज इतके खोलवर रूजले आहे की, ते कायद्यालाही जुमानत नाहीत. आज देशातील ५-६ राज्यांमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा आहे, तरीही तेथे प्रतिदिन किमान एक तरी लव्ह जिहादची घटना घडत आहे. यावरून लव्ह जिहाद्यांची मानसिकता लक्षात येते.
‘इकोसिस्टीम’चे जाळे नष्ट करा !
यावरून ‘केवळ कायदे करून काही होणार नाही, तर या कायद्यात कठोर प्रावधाने (तरतुदी) करून त्यांची प्रभावी कार्यवाही (अंमलबजावणी) करावी लागणार आहे’, हे लक्षात येते. कायदा असूनही लव्ह जिहाद चालूच असणे, हे कायदे कमकुवत असल्याचे द्योतक आहे. जिहाद्यांना जरब बसेल, असे कायदे करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे लव्ह जिहादच्या उच्चाटनासाठी त्याच्या मुळाशी जाणे अपरिहार्य आहे. यासाठी हिंदुविरोधी ‘इकोसिस्टीम’चे जाळे नष्ट करणे आवश्यक आहे; कारण ही ‘इकोसिस्टीम’ हिंदूंच्या मुळावर उठली आहे. दुसरीकडे हिंदूंना धर्मशिक्षण देणेही क्रमप्राप्त आहे. धर्मशिक्षणामुळे धर्माभिमान वाढला की, मग कुणीही हिंदूंचे धर्मांतर करू धजावणार नाही. यासाठी हिंदूंच्या धार्मिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे. एकूणच पंतप्रधानांच्या लव्ह जिहादविषयीच्या वक्तव्यामुळे आता या रोगाचे निदान तरी झालेच आहे, असे म्हणता येईल. आता आवश्यकता आहे ती यावरील उपायांची !
लव्ह जिहाद रोखण्यासाठी प्रभावी कायदा करण्यासह हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यातील धर्माभिमान वाढवणे, हाच प्रभावी उपाय ! |