Muslim Attacked Jain Sadhvis : भरुच (गुजरात) येथे मुसलमान तरुणाकडून ६ जैन साध्वींवर आक्रमण !

गुंडवृत्तीचे धर्मांध मुसलमान !

भरुच (गुजरात) – येथे अल्ताफ हुसेन शेख नावाच्या मुसलमान तरुणाने रस्त्यावरून चालत जाणार्‍या ६ जैन साध्वींवर आक्रमण केले. आक्रमण करण्यापूर्वी आरोपी तरुण बराच वेळ जैन साध्वींचा पाठलाग करत होता. त्याने साध्वींना लाथा मारून खाली पाडले आणि नंतर त्यांना कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून अल्ताफ हुसेन शेखला कह्यात घेतले. पोलीस या प्रकरणी पुढील अन्वेषण करत आहेत.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, ६ श्‍वेतांबर साध्वी या भरूच येथून ‘जैन साध्वी विहार’कडे चालल्या होत्या. महंमदपुरा येथील अल्ताफ हुसेन शेख याने रस्त्यावर त्यांचा पाठलाग चालू केला आणि नंतर त्यांना घाबरवू लागला. त्यांनी अल्ताफला दूर रहाण्यास सांगितले, तेव्हा त्याने एका साध्वींवर आक्रमण केले. त्याने लाथा मारून त्यांना खाली पाडले. त्या जमिनीवर पडल्यानंतर त्याने सर्वांवर कमरपट्ट्याने आक्रमण केले. या वेळी तेथून जाणार्‍या एका व्यक्तीने साध्वींना वाचवले आणि या घटनेविषयी गावकरी आणि पोलीस यांना माहिती दिली.

संपादकीय भूमिका

भारतात मुसलमान असुरक्षित असल्याचा टाहो फोडून साम्यवादी आणि कथित सेक्युलरवादी यांनी त्यांना गुन्हे करण्यास सुरक्षितता प्रदान केली आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !