Death Threats To ‘Hamare Baarah’! : ‘हमारे बारह’ चित्रपटातील कलाकारांना जिवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या !

चित्रपटात मुसलमानांच्या परंपरांवर करण्यात आले आहे भाष्य !

मुंबई – हिंदी चित्रपट ‘हमारे बारह’चे निर्माते आणि कलाकार यांना ठार मारण्याच्या, तसेच बलात्कार करण्याच्या धमक्या मिळाल्याने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. हा चित्रपट इस्लाममधील चालीरिती आणि परंपरा यांवर भाष्य करणारा असल्याने या धमक्या मिळाल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाद्वारे ‘इस्लाम धर्माची कोणती व्याख्या योग्य आहे ?’, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. हा चित्रपट कमल चंद्रा यांनी दिग्दर्शित केला असून ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांची यात प्रमुख भूमिका आहे.

निर्मात्यांनी सांगितले की, केवळ आम्हालाच नाही, तर आमच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्र यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मात्र ‘तुम्ही महाराष्ट्रात आहात, तुमचे काहीही चुकीचे होणार नाही’, अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे. हा चित्रपट आम्ही मोठ्या प्रेमाने बनवला आहे. इतक्या द्वेषाला सामोरे जावे लागेल, असे कधीच वाटले नव्हते.

काय आहे चित्रपटात ?

‘हमारे बारह’ चित्रपट नुकताच ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४’ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाचा नायक एक मुसलमान असून तो त्याच्या धार्मिक श्रद्धांना बांधील आहे, असे दाखवण्यात आले आहे. त्याच्यातील धर्मांधतेमुळे त्याच्या १२ व्या मुलाला जन्म देतांना त्याची पत्नी मरण पावते, तेव्हा त्याला इस्लामविषयी नवीन काहीही शिकण्याची संधी कशी मिळाली नाही ?, याविषयी तो तिच्या थडग्यावर जाऊन सांगण्याचा प्रयत्न करतो, असेही दाखवण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • मुसलमानांच्या धर्माविषयी कुणी काही बोलले किंवा लिहिले, तर त्याला थेट ठार मारण्याच्याच धमक्या मिळतात. कायद्याच्या आधारे कारवाई करण्याचा विचार कधीही केला जात नाही. याविषयी एकही राजकीय पक्ष, निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी तोंड उडघत नाहीत; मात्र ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे सांगत ते ऊर बडवून घेत असतात !
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणारे आता कुठे आहेत ? अभिव्यक्ती केवळ हिंदूंच्या धर्माविषयीच असते का ?