अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या ४ मुसलमानांना जन्मठेपेची शिक्षा

मधुबनी (बिहार) – अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणारे महंमद जफर अन्सारी, महंमद जिब्रिल, महंमद अहमद आणि अख्तर अन्सारी या ४ आरोपींना येथील जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या सर्वांना प्रत्येकी २५ सहस्र  रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

५ सप्टेंबर २०२२ या दिवशी १६ वर्षीय पीडित मुलगी तिच्या भावासमवेत कासेरा गावात जत्रेला गेली होती. काही वेळानंतर पीडित मुलगी जत्रेच्या ठिकाणाजवळील एका शाळेत शौचास गेली. या वेळी आरोपींनी या मुलीला पकडून शाळेच्या छतावर नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. जेव्हा मुलीने आरडाओरड केली तेव्हा आजूबाजूचे लोक तेथे पोचले. त्यापूर्वी आरोपी तेथून पळून जाऊ लागले. यांतील जफर अन्सारीला लोकांनी पाठलाग करून पकडले. त्यानंतर पोलिसांनी अन्य ३ जणांना अटक केली.

संपादकीय भूमिका 

अशा बलात्कार्‍यांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांना दगड मारून ठार करण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !