भारतीय न्यायप्रणालीची स्थिती ! वर्ष २०१७ मधील शिक्षा अंतिम करायला इतकी वर्षे का लागली ?

‘विधी शाखेच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने महंमद अमीर-उल्-इस्लाम याला फाशीची शिक्षा सुनावली. २ एप्रिल २०१६ या दिवशी ‘एर्नाकुलम् गव्हर्नमेंट लॉ कॉलेज’च्या विद्यार्थिनीचा मृतदेह राज्यातील पेरुंबवूरमधील तिच्या घरात सापडला. इस्लाम याला वर्ष २०१७ मध्ये एर्नाकुलम् सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात त्याने केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर मे २०२४ मध्ये उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.’ (२२.५.२०२४)