विश्वभर व्हावे गुरुकार्याचे संकीर्तन ।

‘एकदा शिबिर संपल्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांचा निरोप घेतला. तेव्हा त्यांची आणि साधकांची भावस्थिती अनुभवता आली. वात्सल्यभावाने त्यांनी साधकांना जसे पाहिले, ते पाहून तेव्हाचे क्षण आठवले आणि मला पुढील काव्य सुचले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

माय माऊली (टीप १) वात्सल्यतेने पहाते लेकरांना ।
तैसेची रूप तुझे आम्हा भासले, जेव्हा पाहिले तू साधकांना ।। १ ।।

सौ. स्‍वाती शिंदे

सर्वत्र गुरु (टीप २) कीर्तन करण्या साधक जन निघाले ।
पाठवणी करतेस तू देऊन चैतन्य शिदोरीने ।। २ ।।

लेकरांनाही वाटते येऊ लवकर परतूनी ।
घेण्या क्षणभर विसावा तव चरणी ।। ३ ।।

विश्वभर व्हावे गुरुकार्याचे संकीर्तन ।
हाच तुझा ध्यास, हेच तुझे चिंतन मनन ।। ४ ।।

जैसे तुजला अपेक्षित तैसी भावसेवा घडावी ।
प्रार्थना ही अज्ञानी बालकाची स्वीकारावी ।। ५ ।।

टीप १ – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले

– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक