कोल्हापूर – कोल्हापूर येथे २० मे या दिवशी दुपारी मान्सूनपूर्व वादळी वार्यासह मुसळधार पाऊस झाला. जोतिबा डोंगरावर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली होती, तर काही ठिकाणी विजेचे खांब पडले होते. वादळी वार्यामुळे काही घरांचे पत्रे उडून गेले, याच समवेत वडणगे स्मशानभूमीचे छत वार्याने उडाले होते. जोतिबा रस्त्यावर काही ठिकाणी असलेल्या गाड्यांवर झाडे पडली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र २ जण घायाळ झाले. अचानक आलेल्या जोरदार पावसाने अनेकांची तारांबळ उडाली.