तीव्र शारीरिक त्रासांतही तळमळीने सेवा करणार्‍या देवद येथील सनातनच्या आश्रमातील कु. सुषमा लांडे !

१. ‘कु. सुषमाताई साधकांशी शांत, प्रेमाने आणि सहजतेने बोलते.

कु. सुषमा लांडे

२. परिपूर्ण सेवेचे महत्त्व सांगणे

कु. सुषमाताई स्वतः भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करते अन् सहसाधकांनाही परिपूर्ण सेवेचे महत्त्व सांगते. ती साधकांची सेवा परिपूर्ण होण्यासाठी त्यांना प्रेमाने सांगते.

३. ताई ‘गुरुधन वाया जाऊ नये’, याची पुष्कळ काळजी घेते.

४. इतरांचा विचार करणे

ती एखाद्या पदार्थाची चव घेते आणि इतर साधकांनाही चव घेण्यास सांगते. त्या वेळी तिच्या मनात केवळ ‘साधकांना चांगले जेवण दिले पाहिजे’, हाच विचार असतो.

५. साधनेचे गांभीर्य

सौ. मनीषा पिंपळे

ती विभागातील साधकांना ‘व्यष्टी साधना झाली का ?’, हे पुष्कळ प्रेमाने विचारते. त्यांचा  नामजप झाला नसल्यास त्यांना त्यामागील कारण विचारून त्यांना नामजप करायला पाठवते. ‘साधकांची व्यष्टी साधना आणि परिपूर्ण सेवा कशी होईल ?’ याकडे तिचे लक्ष असते.

६. इतरांच्या चुकांची प्रेमाने जाणीव करून देणे

विभागातील साधकांना ती प्रेमाने चुका सांगते. त्यांना ‘काय चुकले ?’, याचे चिंतन करा आणि फलकावर चुका लिहा’, असे सांगते. दुसर्‍या दिवशी ‘चूक लिहिली का ? चिंतन केले का ?’, याचा आढावाही घेते. साधक बोलण्यात चुकत असतील, तर त्यांना ‘कसे बोलायला पाहिजे ?’ हे सांगते. एखाद्या साधकाला प्रसंगातून बाहेर येता येत नसेल, तर ताई त्याला त्या स्थितीतून लगेच बाहेर काढते.

७. प्रेमभाव

एकदा मला आध्यात्मिक त्रास होत होता. मला नामजपादी उपायांनासुद्धा बसावेसे वाटत नव्हते. तेव्हा ताई माझ्या हाताला धरून स्वतः माझ्या सोबत उपायांना बसली. ‘उपाय केले की, बरे वाटते’, असे ती प्रेमाने सांगते.

८. सेवेची तीव्र तळमळ

अ. ताईला पुष्कळ शारीरिक त्रास आहे, तरी ती सेवेच्या ठिकाणी लवकर येऊन विभागातील साधकांच्या सेवांचे नियोजन करते आणि स्वतःही गुरुसेवा करते. ती स्वतःची व्यष्टी साधना करत इतर साधकांची काळजी घेते.

आ. एके दिवशी ताईला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत होता. तेव्हा तिने सद्गुरु राजेंद्रदादांना (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना) आध्यात्मिक उपाय विचारले. त्या वेळी तिच्यासाठी नामजपादी आध्यात्मिक उपायांचा नामजप शोधतांना सद्गुरु राजेंद्रदादांना बराच त्रास झाला. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादा मला म्हणाले, ‘‘ताईंसाठी नामजप शोधतांना मला एवढा त्रास होत आहे, तर त्यांना प्रत्यक्ष किती त्रास होत असेल ! एवढ्या त्रासातही त्या कशा काय सेवा करत आहेत ?’’ ‘ताईला किती त्रास होत आहे ?’, हे सद्गुरु राजेंद्रदादांनी सांगितल्यावर आमच्या लक्षात आले. ताई एवढ्या त्रासातही शांत आणि आनंदी दिसत होती अन् शांतपणे साधकांचे प्रश्न सोडवत होती.

९. अल्प अहं

अ. एके दिवशी ताईने स्वतः एका पदार्थाची चव बघितली आणि ती अन्य साधकांनाही दाखवली. तेव्हा मी तिला सांगितले, ‘‘तू इतका चवदार स्वयंपाक करत असतांना इतरांना पदार्थाची चव दाखवायची काहीच आवश्यकता नाही.’’ तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘मला काहीच येत नाही.’’ तेव्हा ‘तिच्यात किती अल्प अहं आहे !’, हे मला जाणवले.

आ. मी एकदा ताई करत असलेल्या सेवांविषयी तिला विचारले, ‘तुला हे सर्व कसे जमते ?’ तेव्हा ती म्हणाली, ‘हे सर्व परम पूज्यच करून घेतात. तेच मला शक्ती देतात.’

१०. ताई विभागात असते, तेव्हा सर्वांना पुष्कळ आनंद वाटतो.

मला सुषमाताईसारखी दायित्व सांभाळणारी साधिका मैत्रीण म्हणून दिली, याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. मनीषा पिंपळे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.९.२०२३)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक