बारामती येथे तलाठ्याच्या नावाने लाच घेतांना खासगी व्यक्तीस अटक !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – सासर्‍यांच्या नावावर असलेल्या जागेवर पत्नीच्या नावाची वारस म्हणून नोंद करण्यासाठी तलाठ्याच्या नावाने ३ सहस्र रुपयांची लाच घेतांना खासगी व्यक्ती चंद्रकांत जावळकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही घटना बारामती शहरातील तलाठी कार्यालयाच्या बाहेर १७ मे या दिवशी घडली. या प्रकरणी ३४ वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती.

संपादकीय भूमिका :

अजूनही तळागाळात भ्रष्टाचार चालू आहे, तर देश भ्रष्टाचारमुक्त कधी होणार ?