न्यूयॉर्क – गाझामध्ये भारतीय सैन्यदलाच्या माजी अधिकार्याच्या मृत्यूविषयी संयुक्त राष्ट्रांनी शोक व्यक्त केला आहे आणि भारताची क्षमा मागितली आहे. दक्षिण गाझामधील रफाह शहरात संयुक्त राष्ट्रांचे सुरक्षासेवा समन्वयक कर्नल वैभव अनिल काळे (४६ वर्षे) यांच्या वाहनावर आक्रमण झाले होते आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. कर्नल वैभव काळे यांनी वर्ष २०२२ मध्ये भारतीय सैन्यदलातून मुदतपूर्व निवृत्ती घेतली होती आणि सध्या ते संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा विभागामध्ये सुरक्षासेवा समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत होते. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून कर्नल वैभव अनिल काळे यांच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त केला आहे. गाझामध्ये सध्या संयुक्त राष्ट्रांचे ७१ आंतरराष्ट्रीय कर्मचारी कार्यरत आहेत.