१४.५.२०२४ या दिवशी यातील काही अनुभूती पाहिल्या. आज उर्वरित अनुभूती पाहूया.
या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/793528.html
८. सौ. हर्षदा संजय बुणगे, कामोठे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले हिंदु राष्ट्राची स्थापना चालू होण्यापूर्वी शंखनाद करत आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी वातावरणात पुष्कळ चैतन्य जाणवून ‘हिंदु राष्ट्राची स्थापना झाली आहे’, असे मला वाटत होते. तेव्हा मला महाभारताच्या युद्धापूर्वी श्रीकृष्णाने केलेल्या शंखनादाची आठवण झाली.’
९. कु. प्रिया मिसाळ, कामोठे
अ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडे पहातांना ‘मी प्रत्यक्ष लक्ष्मीदेवीकडे पहात आहे’, असे मला वाटले.
१०. कु. वैष्णवी मिसाळ, कामोठे
अ. ‘१२.५.२०२० या दिवशी रात्रभर मला झोप आली नाही. माझ्या डोळ्यांसमोर परात्पर गुरु डॉक्टर दिसत होते. ‘रात्रभर न झोपता सतत याच स्थितीत रहावे’, असे मला वाटत होते.
आ. पू. वामनदादांना (सनातनचे दुसरे बाल संत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांना) पाहिल्यावर ‘त्यांच्या शरिरातून पिवळ्या आणि भगव्या रंगाचा प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.’
११. पल्लवी सुभाष सागवेकर, महाड
‘१३.५.२०२० या दिवशीच्या कार्यक्रमात गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर लावलेला तुपाचा दिवा २.३० घंटे तेवत होता. १५.५.२०२० या दिवशीच्या कार्यक्रमात तोच दिवा, तीच वात आणि तेवढेच तूप घालून लावलेला दिवा ५ घंटे तेवत होता.’
१२. सौ. रश्मी म्हैसकर, रसायनी
‘परात्पर गुरु डॉक्टरांना हसतांना पाहून ‘त्यांच्या हसण्यातून ते आम्हाला चैतन्य देत आहेत’, असे मला वाटले.’
१३. कु. आदित्य प्रकाश मोरे, नागोठणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रासमोर ठेवलेले पाणी तीर्थ म्हणून प्यायल्यावर ते मला पुष्कळ गोड लागले.’
१४. सौ. उज्ज्वला पाटील, खांदा कॉलनी
‘१३.५.२०२० या दिवशी सकाळी ‘पांढरा सदरा आणि विजार घातलेले गुरुदेव आमच्या घरी आले आहेत आणि सोफ्यावर बसून आमच्याकडे पहात आहेत’, असे मला जाणवत होते. त्यामुळे घरात चैतन्य जाणवू लागले.’
१५. श्रीमती कमल साळवी, श्रीमती अनुराधा मुळ्ये, सौ. स्वाती वाटेगावकर आणि श्रीमती सुनीता निमकर, पनवेल
‘कार्यक्रमाच्या वेळी आम्ही रामनाथीलाच आहोत’, असे वाटून आमचा भाव जागृत झाला.’ (समाप्त)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |