US Indian Student Missing : अमेरिकेत आता आणखी एक भारतीय विद्यार्थी बेपत्ता !

रूपेश चंद्रा २ मेपासून शिकागो शहरातून बेपत्ता !

भारतीय विद्यार्थी रूपेश चंद्रा

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत गेल्या ६ महिन्यांपासून तेथे शिक्षणासाठी गेलेले अथवा भारतीय वंशाचे तेथेच वास्तव्य करणारे भारतीय विद्यार्थी यांच्यावर अनेक आक्रमणे झाली आहेत. या कालावधीत किमान ११ भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यूही झाला आहे. अशीच एक घटना आता शिकागो येथे घडली असून एन् शेरीडन रोडच्या ४३०० ब्लॉकमधून रूपेश चंद्रा हा भारतीय विद्यार्थी २ मेपासून बेपत्ता आहे.

शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे की, भारतीय विद्यार्थी रूपेश चंद्राच्या बेपत्ता झाल्याची बातमी ऐकून महावाणिज्य दूतावास अत्यंत चिंतेत आहे. दूतावास भारतीय समुदाय आणि पोलीस यांच्या सतत संपर्कात आहे अन् लवकरच रूपेशचा शोध लागेल, अशी आशा आहे. शिकागो पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की, जर त्यांना रूपेशविषयी काही माहिती मिळाली, तर ती पोलिसांना कळवावी.

संपादकीय भूमिका

  • गेल्या साधारण ६ महिन्यांपासून भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्यांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. भारताच्या विरोधातील हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्रच असून भारताने यावरून अमेरिकेला जाब विचारला पाहिजे !
  • भारतीय विद्यार्थ्यांच्या विरोधात होत असलेल्या अशा कारवायांमागे खलिस्तानी शक्तींचा हात असल्याचे नाकारले जाऊ शकत नाही. या सर्वातून ‘अमेरिका भारतियांसाठी धोकादायक राष्ट्र बनत चालले आहे’, अशा आशयाचे वक्तव्य परराष्ट्र मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर करून अमेरिकेवर दबाव आणला पाहिजे !