श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे साधनेसंदर्भातील अमूल्य मार्गदर्शन

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आपल्याला सगुणाकडून निर्गुणाकडे नेत असल्याने त्यांच्या देहात अडकायला नको !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

आजारपणामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना भेटू शकत नाहीत. यासाठी साधकांनी पुढील दृष्टीकोन ठेवायला हवा.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले स्थुलातून जरी भेटले नसले, तरी त्यांनी दिलेली ऊर्जा आपल्याला मिळतच आहे. ‘सूक्ष्मातून त्यांनी आपल्याला किती ऊर्जा दिलेली आहे ?’, ते आपल्या लक्षात येत नाही. आश्रमात जे साधक अजून आलेले नाहीत, त्या साधकांनाही गुरुदेव ऊर्जा देतच असतात. साधक म्हणजे गुरुदेवांचा प्राण आहेत. जेव्हा सगुण तत्त्व आवश्यक असते, तेव्हा ते मिळते; तसेच निर्गुण तत्त्व आवश्यक असते, तेव्हा ते मिळते. वैकुंठात आलेल्या जिवाला श्रीविष्णु असेच परत पाठवील का ? सगुणापेक्षा निर्गुण श्रेष्ठ आहे. आता ते आपल्याला सगुणाकडून निर्गुणाकडे नेत आहेत. त्यामुळे त्यांच्या देहात अडकायला नको.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२९.९.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.