लव्ह जिहादची प्रकरणे सर्वत्र वाढत चालली आहेत. आता तर वर्तमानपत्रांत प्रतिदिनच लव्ह जिहादच्या विळख्यात अडकलेल्या हिंदु मुलींच्या बलात्कार, हत्या, आत्महत्या यांच्या हृदय पिळवटून टाकणारी वृत्ते असतात. काही दिवसांपूर्वीच कर्नाटक येथील नेहा हिरेमठ या महाविद्यालयीन हिंदु मुलीची महाविद्यालयाच्या आवारातच निर्घृण हत्येची बातमी सर्वांनी वाचली आणि त्या क्रूर हत्येचा प्रसारित झालेला व्हिडिओही बघितला. तिने फैयाज खोंडू नाईक या धर्मांधाचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला; म्हणून त्याने थेट तिचे आयुष्यच संपवले. हे कसले प्रेम ? ही तर वासनांधता, क्रोधातून निर्माण झालेली पाशवी क्रूरताच ! खरे प्रेम त्याग शिकवते, निरपेक्षपणे जगायला शिकवते, दुसर्याच्या आनंदात आनंद मानायला शिकवते; पण नेहासमवेत जे झाले, ते प्रेमप्रकरण नसून ‘लव्ह जिहाद’चेच प्रकरण आहे ! हे साध्या अशिक्षित माणसालाही सहज लक्षात येईल; पण हे साधे सरळ सूत्र कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना समजत नाही कि समजत असूनही केवळ मुसलमान मतपेटीसाठी त्यांना ते मान्य नाही ? काँग्रेसची ही मानसिकता इतकी खालच्या थराला पोचली आहे की, ज्यामुळे तिने स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणला आहे !
काँग्रेस केवळ मतपेटीसाठी मुसलमानांविरुद्ध एक चकार शब्द काढायला धजावत नाही; म्हणून नेहाचे वडील निरंजन हिरेमठ, जे स्वतः काँग्रेसचे नगरसेवक आहेत, त्यांनी निष्पक्ष चौकशी होण्यासाठी ‘सीबीआय’कडे हे प्रकरण सोपवण्याची मागणी केली आहे. अजून किती हिंदु आया-बहिणींच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेल्यावर आपण जागृत होणार आहोत ? दिवसाढवळ्या या अशा घटना घडतात आणि हिंदु मात्र बघ्याची भूमिका घेतात. गेल्या वर्षी देहलीच्या श्रद्धा, साक्षी यांसमवेत जे झाले, तेच कर्नाटकच्या नेहासमवेत झाले. तेच लग्नाचे आमीष, खोटे प्रेमाचे नाटक, तीच वासनांधता, तीच फसवणूक, बलात्कार, क्रूरता, धर्मांतरासाठी दबाव, नरकयातना, अश्लील चित्रीकरण प्रसारित करण्याच्या धमक्या अन् शेवटी तिच्या अमूल्य जीवनाचा अंत ! याला प्रेम कोण म्हणेल ? ती भोगवासनाच ! ‘द केरल स्टोरी’ चित्रपटात दाखवलेले वास्तव फक्त केरळपुरते मर्यादित कधीच नव्हते, हा ‘लव्ह जिहादचा वणवा’ तीव्रतेने देशभर पसरलेला आहे. यावर धर्माचरण आणि कडक शासन यांची ढगफुटी झाल्याखेरीज तो विझणार नाही ! हा वणवा पेटत आपल्या घरी आला आहे, तरीही अनेक हिंदु गप्पच बसले आहेत ! स्वतःच्या घराला आग लागायची वेळ आली आहे, तरीही ते फारसे हालचाल करत नाहीत ! त्यांची अवस्था मातीत डोके खुपसून बसलेल्या शहामृगासारखीच होणार आहे ! पालकांनी शालेय शिक्षणासमवेत मुलींना धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षणाचे धडे देण्याची अन् शासनाने लव्ह जिहादींना छत्रपती शिवरायांप्रमाणे चौरंग्याची शिक्षा भरचौकात देण्याची आवश्यकता आहे !
– सौ. प्रज्ञा जोशी, पनवेल.