ब्रह्मोत्सवानंतर झालेल्या ‘चंडीयागा’च्या वेळी आलेल्या अनुभूती

वर्ष २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ब्रह्मोत्सव स्वरूपात साजरा केला होता. या ब्रह्मोत्सवानंतर झालेल्या ‘चंडीयागा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

सौ. उषा कांबळे

१. यज्ञाला येण्यापूर्वी ‘निरुत्साही वाटणे, जांभया आणि ग्लानी येणे’, असे त्रास होणे, यज्ञ चालू झाल्यावर हे त्रास दूर होण्यासाठी प्रार्थना केली जाणे

‘ब्रह्मोत्सवानंतर १४ आणि १५.५.२०२३ या दिवशी चंडियाग होता. यज्ञाला येण्यापूर्वी माझे मन निरुत्साही झाले होते. यज्ञाला आल्यावर सतत जांभया येऊन माझ्या डोळ्यांमध्ये पाणी येत होते. मला मधे मधे ग्लानीही येत होती. यज्ञ चालू झाल्यावर मला चांगले वाटू लागले. यज्ञ चालू असतांना माझ्याकडून सतत ‘माझ्यावरील सर्व त्रासदायक आवरण नष्ट होऊ दे. माझ्यातील सर्व नकारात्मक शक्ती यज्ञात नष्ट होऊ दे’, अशा प्रार्थना होत होत्या. ‘हे सर्व गुरुदेव आम्हा साधकांसाठीच करत आहेत’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त होती.

२. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हात धरला असून सर्व तेच करून घेणार आहेत’, या जाणिवेने भावजागृती होणे

माझ्या मनात प्रश्न होता, ‘देवा, तुम्हाला अपेक्षित असे माझ्याकडून काहीच होत नाही. मी कशी प्रगती करू शकणार ?’ त्याच वेळी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक शानभाग वानरांची गोष्ट सांगतांना म्हणाले, ‘आपल्यामध्ये असलेली दैवी शक्ती कार्य करत असते.’ त्यातून मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. मला अशा अनुभूतीही आल्या आहेत. माझ्यातील नकारात्मकतेमुळे माझ्या मनात निराशेचे विचार येतात. ‘गुरुमाऊलीने माझा हात धरला असून गुरुमाऊलीच माझ्याकडून सर्व करून घेणार आहे’, असे वाटून माझी भावजागृती झाली आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.

३. यज्ञाच्या पहिल्या दिवसापेक्षा दुसर्‍या दिवशी माझ्या मनाची स्थिती आनंदाची होती.’

– सौ. उषा कांबळे, अमरावती (१३.५.२०२३)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक