Vijay Wadettiwar On Kasab: (म्हणे) ‘संघ समर्थक अधिकार्‍याने कसाबला गोळी घातली !’ – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

निवडणूक प्रसाराच्या वेळी देशविरोधी वक्तव्ये करत आहोत, याचेही भान नसलेले नेते !

कसाब ,दिवंगत हेमंत करकरे ,व विजय वडेट्टीवार

मुंबई –  महाराष्ट्र आतंकवादी विरोधी पथकाचे प्रमुख दिवंगत हेमंत करकरे यांना लागलेली गोळी पाकिस्तानचा आतंकवादी कसाबच्या बंदुकीतील नव्हती. कोणत्याही अतिरेक्याची नव्हती, तर ती गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक एका पोलीस अधिकार्‍याच्या बंदुकीतील होती. त्या वेळी हे पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल, तर तो माजी विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम आहेत. अशा देशद्रोह्याला भाजप तिकीट देत असेल, तर देशद्रोह्याला पाठीशी घालणारा भाजप पक्ष आहे का ? हा प्रश्‍न येतो’, असे अकलेचे तारे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार येथे तोडले आहेत. ५ मे या दिवशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, विलासराव देशमुख यांनीही चर्चेत सांगितले होते. मी आजच या विषयावर बोलत नाही. त्या वेळीही बोललो होतो. प्रसिद्धीमाध्यमात ते प्रसिद्ध झाले आहे. ज्या गोळीने हेमंत करकरे हुतात्मा झाले होते, ती गोळी कसाबची नव्हती. हे स्पष्ट आहे. राज्याचे माजी विशेष पोलीस महासंचालक एस्.एम्. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा आधार घेऊनच मी म्हटले आहे. (आधार कशाचा घ्यायचा हेही न कळणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांना आता घरी बसवा ! – संपादक)

निवडणुकीत मते मिळवण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार ? – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. वडेट्टीवार यांनी पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली आहे. भाजपाला विरोध करण्यासाठी २६/११ मुंबई आक्रमणातील आतंकवादी अजमल कसाबची बाजू कशी काय घेता ? थोडी तरी लाज बाळगा. वडेट्टीवार यांनी हा जावईशोध लावला आहे. निवडणुकीत मते मिळवण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार ? मोदी सत्तेत आले, तेव्हा आतंकवाद्यांचे कंबरडे मोडले; पण आज काँग्रेस आतंकवाद्यांसाठी अश्रूू ढाळत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत असतांना आतंकवादी याकुब याच्या कबरीचे सुशोभिकरण केले गेले. आता कसाबचा पुळका आला आहे. काँग्रेस आणि वडेट्टीवार यांच्या पाकधार्जिण्या भूमिकेविषयी जनता धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाही.

संपादकीय भूमिका

सर्व काही पुराव्यानिशी न्यायालयात सिद्ध झाले असल्याने वडेट्टीवार यांचा न्यायालयावर विश्‍वास नाही, असे म्हणायचे का ? मुसलमानांची मते मिळवण्यासाठी कायम समाजघातकी वक्तव्ये करून खालच्या पातळीला जाणार्‍या नेत्यांचा पक्षाचे राजकीय अस्तित्व संपले, तर कुणाला आश्‍चर्य वाटणार नाही !