आमदार टी. राजा सिंह, सुरेश चव्हाणके आदींच्या हत्येचा कट उघड

सुरत येथून मौलानाला (इस्लामच्या अभ्यासकाला) अटक

टी. राजासिंह

सुरत (गुजरात) – ‘सुदर्शन न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ संपादक डॉ. सुरेश चव्हाणके, भाजपचे आमदार टी. राजा सिंह, भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि हिंदुत्वनिष्ठ उपदेश राणा यांच्या हत्येचा कट रचणार्‍या मौलाना सोहल अबुबकर याला अटक करण्यात आली आहे. या मौलानाचे पाकिस्तान आणि अनेक इस्लामी देशांशी संबंध आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

याआधीही चव्हाणके यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती गुजरातमधून समोर आली होती. गुजरात आतंकवादविरोधी पथकाने ही माहिती दिली होती. त्यामध्ये चव्हाणके यांच्याखेरीज पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, उपदेश राणा, यति नरसिंहानंद सरस्वती यांचाही समावेश होता.