१. जाणवलेले सूत्र
१ अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी धर्मरक्षणासाठी अवतार घेतला आहे’, असे वाटणे : ‘भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे की, ‘ज्या ज्या वेळी धर्मावर संकट येईल, त्या वेळी मी पुन्हा पृथ्वीवर अवतार घेईन.’ खरोखरच आज भारत देश आणि हिंदु धर्म यांच्यावर संकटे आली आहेत. यासाठीच श्रीकृष्णस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी अवतार घेतला आहे. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन यांमुळे हिंदु धर्म अन् हिंदु राष्ट्र यांच्या स्थापनेसाठी संत, सद्गुरु आणि अनेक साधक हे सर्व जण प्राणपणाने साधना करत आहेत.
२. अनुभूती
२ अ. आश्रमातील चांगल्या स्पंदनांमुळे ‘शरीर फुलपाखरासारखे हलके झाले आहे’, असे जाणवणे : ‘रामनाथी आश्रम हा स्वर्ग आहे’, याची मला प्रत्येक क्षणाला अनुभूती येत होती. आश्रमातील प्रत्येक वस्तूमधून उच्च कोटीची चांगली स्पंदने येत होती. मी रामनाथी आश्रमामध्ये आल्यावर माझे शरीर म्हणजे ‘चालता बोलता मातीचा गोळा आहे’, असे मला वाटत होते आणि आश्रमातून परत जातांना ‘माझे शरीर फुलपाखरासारखे हलके झाले आहे’, असे मला जाणवले.
मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कॅप्टन विजयकुमार मोरे (निवृत्त), सातारा (१६.१२.२०२२)
|