लुधियाना, पंजाब येथील सौ. माधवी प्रमोद शर्मा यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘मी वैकुंठस्वरूपी रामनाथी आश्रम पहात असतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. स्वागतकक्षातील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र

स्वागतकक्षातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर मला निर्विचार स्थिती अनुभवता आली. मला ते छायाचित्र सजीव भासत होते. ‘त्या छायाचित्रातील निर्गुण तत्त्वात वाढ झाली आहे. त्या छायाचित्रातून ब्रह्मांडात चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.

 २. रामनाथी आश्रमातील दीपोत्सवाचे छायाचित्र

सौ. माधवी प्रमोद शर्मा

रामनाथी आश्रमातील दीपोत्सवाच्या छायाचित्राचे दर्शन घेतांना मला वाटले, ‘तेथे जणू काही नारंगी रंगाचा सूर्य आहे. हा सूर्य कलियुगातील अंधकार दूर करत चैतन्यरूपी किरणांनी संपूर्ण ब्रह्मांडात हिंदु धर्माचे चैतन्य प्रक्षेपित करत आहे. सूर्य वातावरण आणि सृष्टी यांची शुद्धी करत असतांना संपूर्ण प्राणी जगतात रामराज्य स्थापन करण्याची चेतना आणि आशा निर्माण करत आहे. ‘आश्रमाच्या शिखरावर लावलेला ध्वज सुवर्णाचा आहे’, असे वाटले.’

३. ध्वनीचित्रीकरण कक्ष

मी ध्वनीचित्रीकरण कक्षात प्रवेश करताच माझी भावजागृती झाली. ‘मी एखाद्या उच्च लोकात प्रवेश केला आहे’, असे मला जाणवले.

४. हनुमानाची मूर्ती

हनुमानाची मूर्ती पाहून तेथे ‘साक्षात् हनुमान विराजमान आहे’, असे मला जाणवले. ‘महाभारताच्या युद्धात (श्रीकृष्णाच्या) अर्जुनाच्या रक्षणासाठी हनुमान रथावरील ध्वजावर विराजमान झाला होता, त्याचप्रकारे आताच्या घोर कलियुगात रामराज्याची स्थापना करण्यासाठी हनुमान वैकुंठरूपी रथावर आरूढ झाला आहे’, असे मला वाटले.

५. स्वयंपाकघर 

मला स्वयंपाकघरात सेवा करत असलेल्या सर्व साधकांमध्ये गुरुदेवांचे रूप दिसत होते. ‘ते सर्व साधक सेवाभावाने आणि श्रद्धेने नामजप करत कशी सेवा करता येते’, हे शिकवत आहेत’, असे मला जाणवले.

६. आश्रमातील तीर्थासम पाणी

आश्रमातील पाणी एवढे मधुर होते की, ‘साक्षात् वरुणदेव पाण्यात विराजमान आहेत. या पाण्यात सप्तनद्यांच्या देवींनी जलाने गुरुचरणांचे प्रक्षालन केल्यामुळे ते तीर्थ बनून पाण्यात मिसळले आहे’, असे मला वाटले. ते तीर्थ ग्रहण केल्यावर मला चैतन्य मिळून माझे त्रास न्यून झाले.

७. मला आश्रम पहातांना वेगवेगळे सुगंध येत होते. त्यामुळे माझा भाव जागृत झाला आणि मला चैतन्य मिळाले.

८. मला जाणवले, ‘उच्च लोकांतील देवता वैकुंठात आल्या आहेत. संपूर्ण ब्रह्मांडात चैतन्याचा वर्षाव होत आहे. गुरुदेवांना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी देवता आणि पुण्यात्मे सहकार्य करण्यासाठी सिद्ध आहेत.’

९. आपत्काळातही साधकांचे रक्षण होण्याविषयी निश्चिती होणे

मला वरील अनुभूती आल्याने एवढा आनंद झाला की, मला वाटले, ‘घोर आपत्काळातही सर्व साधकांना चैतन्य मिळणार आहे. ते आनंदात असणार आहेत. रामराज्य लवकरच येणार आहे.’ मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.

१०. वैकुंठदर्शन करतांना मला वाटले, ‘गुरुदेवांच्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शन घेत आहे.’

– सौ. माधवी प्रमोद शर्मा, लुधियाना, पंजाब. (१०.६.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक