|
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील प्रथितयश विद्यापिठांमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ सातत्याने आंदोलने चालू आहेत. ‘असोसिएटेड प्रेस’नुसार आतापर्यंत ९०० विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. २९ एप्रिल या दिवशी जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट विद्यापिठांपैकी एक असलेल्या हार्वर्ड विद्यापिठात विद्यार्थ्यांनी चक्क पॅलेस्टिनी ध्वज फडकावला. विद्यापिठात जॉन हार्वर्ड यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे जिथे अमेरिकेचा ध्वज फडकतो, तिथे पॅलेस्टिनी ध्वज फडकावण्यात आला. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करणार असल्याचे विद्यापिठाच्या प्रवक्त्याने सांगितले.
Anti-Israel Protest in the #Harvard University : Palestinian flag raised in the renowned American University.
🔸900 protesting students arrested so far !
🔸Protesters gave terrorizing slogans like, 'Kill the Jews'.
👉 Everybody knows who is supporting #Palestine
🔸However,… pic.twitter.com/BgDMKclsXE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 29, 2024
अशी होत आहेत विरोधी आंदोलने !
१. बोस्टनच्या ‘नॉर्थईस्टर्न विद्यापिठा’तील आंदोलकांच्या छावण्या उखडून टाकण्यात आल्या असून १०० हून अधिक जणांना कह्यात घेण्यात आले आहे. आंदोलनाच्या वेळी आंदोलनकर्त्यांनी ‘ज्यूंना मारून टाका’ अशा घोषणाही दिल्या.
२. लॉस एंजेलिस येथील ‘सदर्न कॅलिफोर्निया’ विद्यापिठात इस्रायल समर्थक आणि पॅलेस्टाईन समर्थक समोरासमोर आले. त्यांच्यात हाणामारी झाली. या वेळी विद्यापिठात तोडफोडही करण्यात आली.
३. अनेक अमेरिकी विद्यापिठांमध्ये आंदोलनककर्त्यांनी ‘विद्यापिठांनी इस्रायलकडून नफा मिळवणार्या आस्थापनांपासून दूर जायला हवे’, अशी मागणी केली आहे. ‘पोर्टलँड स्टेट विद्यापिठा’ने ही मागणी मान्य केली आहे. विद्यापिठाने ‘बोईंग’ आस्थापनाकडून भेटवस्तू आणि अनुदान न स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केले. एका अहवालानुसार इस्रायलच्या अर्थव्यवस्थेत बोइंगचे २९ सहस्र कोटी रुपयांचे योगदान आहे.
४. अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये चालू असलेल्या आंदोलनांचे लोण आता कॅनडा, युरोप आणि ऑस्ट्रेलिया येथेही पसरले आहे. २७ एप्रिलला कॅनडातील मॅकगिल विद्यापिठात विद्यार्थ्यांनी ‘नरसंहार’ बंद करण्याच्या मागणीसाठी धरणे दिले. सिडनी विद्यापिठातही आंदोलन चालू असल्याचे समजते.
संपादकीय भूमिकापॅलेस्टाईनचे समर्थन करणारे कोण आहेत ? हे जगजाहीर आहे. असे असले, तरी अमेरिकेतील ज्यू धर्मियांच्या प्रभावी दबावगटांपुढे आंदोलनकर्ते साम्यवादी आणि मुसलमान संघटनांचे काहीएक चालणार नाही, हेही तितकेच खरे ! |