अथेन्स (ग्रीक) – सहारा वाळवंटातून धूळ वाहून नेणार्या वार्यांमुळे ग्रीसमधील शहरांतील हवेची गुणवत्ता खालावली असून तापमानात अचानक वाढ झाली आहे. या वार्यांमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वार्यांमुळे जंगलात अवेळी आग लागली आहे. गेल्या २४ घंट्यात ग्रीसमधील एकूण २५ जंगलांना आग लागली आहे. त्यामुळे दृश्यमानताही मर्यादित झाली आहे. मार्च २०१८ मध्येही अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतरची ही सर्वांत वाईट घटना असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेे.