मलठण (दौंड) येथे २९ गोवंशीय जनावरांचे प्राण वाचवण्यात गोरक्षकांना यश !

आजर शेख सह ३ जणांवर गुन्हा नोंद !

(प्रतिकात्मक चित्र)

दौंड (जिल्हा पुणे) – कत्तल करण्यासाठी जाणार्‍या एका टेंपोमधील २७ जर्सी वासरे, १ गीरगाय जातीचे वासरू आणि १ जर्सी गाय असे २९ गोवंश वाचवण्यास यश आले आहे. गोरक्षकांनी मलठण (ता. दौंड) येथे २१ एप्रिलच्या रात्री ९ वाजता गोवंश घेऊन जाणारा टेंपो पकडला. त्यानंतर त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी अमोल खंडाळे, सागर खंडाळे यांच्यासह जनावरांचा मालक आजर शेख याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक आमीर शेख यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. २९ गोवंशियांची सुखरूप सुटका केल्यानंतर गोवंशीय जनावरांना केडगाव चौफुला येथील बोरमलनाथ गोशाळेत पाठवण्यात आले.

संपादकीय भूमिका :

प्रत्येकवेळी गोहत्या करण्यामध्ये धर्मांधांचा हात असणे, संतापजनक आहे. धर्मांधांना कठोर शिक्षा होत नसल्याचा हा परिणाम !