‘जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्था पालटल्या, तरीही जे चिद्घन चैतन्य परिवर्तित होत नाही, त्या अखंड आत्म-चैतन्याचे मी ध्यान करतो; कारण तोच माझा स्वभाव आहे. शरिर आणि मन यांचा स्वभाव पालटतो, बुद्धीचे निर्णय पालटतात, तरीही ज्याच्यात परिवर्तन होत नाही, तो अमर आत्मा मी आहे. मी परमात्म्याचा सनातन अंश आहे’, असे चिंतन करणारा साधक संसारात त्वरित निर्लेपभावास, निर्लेपपदास प्राप्त होतो.’
(निर्लेपभाव, निर्लेपपद म्हणजे ज्याला (विकार) चिकटू शकत नाही ते.)
(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)