१. विवाहानंतर २ मासांतच पत्नीला शारीरिक त्रास होऊ लागणे
वर्ष २००९ मध्ये प.पू. गुरुदेवांच्या कृपेने माझ्या साधनेला आरंभ झाला. नोव्हेंबर २०१० मध्ये माझा माधवीशी विवाह झाला. त्या वेळी आमच्या घरातील वातावरण चांगले नव्हते. विवाहानंतर २ मासांतच सौ. माधवीला ‘टी.बी.’ झाला. तिला अत्यंत शारीरिक त्रास होत होता. त्या कालावधीत आमच्या घरात भांडणे होत असत. सौ. माधवी कष्टमय जीवन जगत होती.
२. साधना करत असल्यामुळे पत्नीला होणार्या त्रासाचे कारण लक्षात येणे आणि गुरुदेवांना प्रार्थना करणे अन् पत्नीला पाठिंबा देणे
मी साधना करत असल्यामुळे मला घरात होणारे त्रास आणि माधवीला होणारे त्रास यांच्यामागील सूक्ष्म कारण लक्षात येत होते; मात्र मी ‘गुरुदेवांना प्रार्थना करणे आणि शरणागतभावात रहाणे,’ यांविना दुसरे काहीच करू शकत नव्हतो. या कठीण काळात मी सौ. माधवीला संपूर्ण पाठिंबा देण्याचे प्रयत्न केले. मला जे करणे शक्य होते, ते ते मी केले.
३. पत्नीमुळे स्वतःतील स्वभावदोष लक्षात येणे
गुरुदेवांनी साधकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवली. ‘सौ. माधवीमुळे माझ्यामध्ये किती अहं आहे !’, याची मला जाणीव झाली. ती माझ्या चुका सांगते. तिने माझ्या चुका सांगितल्या नसत्या, तर ‘माझ्यामध्ये किती अहं आहे !’, हे मला कधीच समजले नसते.
४. ‘पत्नीची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, यासाठी गुरुदेवांना प्रार्थना करणे आणि पत्नीच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत झालेली वाढ पाहून आनंद होणे
मी मनातल्या मनात प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करत असे, ‘माधवीने पुष्कळ त्रास सहन केले आहेत. तिचे प्रारब्ध लवकर संपून ती साधनेत पुढे जाऊ दे.’ मी ११ वर्षे अखंड ही प्रार्थना करत होतो. सौ. माधवीच्या माध्यमातून माझी साधना चालू होती आणि तिची साधना चांगली होण्यासाठी माझ्याकडून सतत मनापासून प्रार्थना होत असत. वर्ष २०२१ मध्ये कोरोना महामारीच्या काळात गुरुदेवांच्या कृपेने माधवीची तळमळ आणि मनापासून साधना करणे पुष्कळ प्रमाणात वाढले. तिचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न आणि भावजागृतीचे प्रयत्न पाहून मला पुष्कळ आनंद होऊ लागला.
५. मी मनात म्हणतो, ‘गुरुदेवांच्या कृपेने भविष्यात आमची आध्यात्मिक पातळी घोषित व्हायची असल्यास माझ्या आधी माधवीची आध्यात्मिक उन्नती होऊ दे.’
गुरुदेवांच्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. प्रमोद शर्मा, लुधियाना, पंजाब. (१५.९.२०२२)