कळंबोली येथे १ लाख रुपये किमतीचा ४ किलोग्रॅम गांजा बाळगणारा अटकेत !

(प्रतिकात्मक चित्र)

पनवेल – कळंबोली परिसरात १ लाख रुपये किमतीच्या ४ किलोग्रॅम गांजासह एकाला पोलिसांनी अटक केली. नवी मुंबई पोलीस दलाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी आसूडगाव येथे रहाणार्‍या ३४ वर्षीय दिनेश जाधव याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना एक जण गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी वरील कारवाई केली. या प्रकरणी अधिक अन्वेषण करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका :

अमली पदार्थांचा व्यापार करणार्‍या सर्वांनाच कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !