जागे असतांना बाह्यमन, तर झोपेत अंतर्मन कार्यरत असते

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘आपण ‘मना’चा उल्लेख करतो, तेव्हा त्याचे ‘बाह्यमन’ आणि ‘अंतर्मन’, असे दोन भाग असतात. बाह्यमन केवळ १० टक्के, तर अंतर्मन ९० टक्के असते. आपण जागे असतांना बाह्यमन पूर्णतः कार्यरत असते. त्यामुळे या वेळेत अंतर्मन कार्यरत असले, तरी मनात आलेले विचार बाह्यमनातील आहे कि अंतर्मनातील, हे कळणे कठीण असते. झोपल्यावर मात्र बाह्यमन कार्यरत नसते. त्या वेळी अंतर्मन पूर्णतः कार्यरत असते. त्यामुळे झोपेत स्वप्न पडणे, झोपेत असंबद्ध विचार येणे इत्यादी अंतर्मनामुळे होते.’

–  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले