राजस्थानमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !
जयपूर (राजस्थान) – राजस्थानमधील अलवरमध्ये एका अल्पवयीन हिंदु मुलीला धर्मांध मुसलमान तरुणाने पळवून नेले. त्यानंतर मुसलमान तरुणाने अल्पवयीन मुलीला बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले, तसेच तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी मुसलमान तरुणाच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.
A case of Love J!h@d emerges in #Rajasthan
Fanatic Mu$l!m youth abducts a minor Hindu girl and forcefully converts her
Despite numerous incidents of Love J!h@d occurring everyday in the country, it is shameful that Hindus are not making any concerted efforts for their… pic.twitter.com/aShk7fBxMk
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 17, 2024
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १३ एप्रिल २०२४ या दिवशी जवळच्या बाजारपेठेत गेली होती; मात्र सायंकाळपर्यंत ती परतली नाही. त्यानंतर कुटुंबियांनी तिचा शोध चालू केला असता, त्यांना शेजारच्या गावातील साबीर नावाच्या मुसलमान तरुणाने तिला पळवून नेल्याचे समजले. मुलीच्या कुटुंबियांनी रामगड पोलीस ठाण्यात साबीरच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. पोलिसांनी साबीरच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचे अन्वेषण चालू असल्याचे पोलीस उपअधीक्षक ओमप्रकाश विश्नोई यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकादेशात प्रतीदिन लव्ह जिहादच्या अनेक घटना घडूनही हिंदू ते रोखण्यासाठी ठोस प्रयत्न करत नाहीत, हे त्यांना लज्जास्पद ! हिंदु मुलींच्या रक्षणासाठी हिंदू आता तरी कंबर कसतील का ? |