Surat Water Park : सूरत (गुजरात) येथील वॉटर पार्कमध्ये मुसलमान तरुणांनी दिल्या ‘पॅलेस्टाईन झिंदाबाद’च्या घोषणा

  • विरोध करणार्‍या सुरक्षारक्षकांना केली मारहाण

  • १५ जणांना अटक

(वॉटर पार्क म्हणजे मनोरंजनाचे एक ठिकाण. येथे जलतरण तलाव आणि तत्सम सुविधा असतात)

सूरत (गुजरात) – येथे ‘इमॅजिका वॉटर पार्क’मध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याची घटना समोर आली आहे. सुरक्षारक्षकांनी घोषणाबाजी करणार्‍या मुसलमान तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण करून घायाळ करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे अन्य संशयितांचा शोध चालू आहे. ही घटना १३ एप्रिलला घडली.

(सौजन्य : You Bharat)

वॉटर पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असतांना २ तरुण पॅलेस्टाईनचा ध्वज घेऊन तेथे आले आणि त्यांनी टी शर्ट काढून ‘पॅलेस्टाईन झिंदाबाद’ अशा घोषणा देण्यास चालू केले. त्या वेळी त्यांच्या समवेत आणखी काही तरुण दिसून आले. या सर्व तरुणांना वॉटर पार्कच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करायचा होता. या घटनेमुळे येथे उपस्थितांमध्ये गोंधळ निर्माण झाला. यामुळे स्थानिक सुरक्षारक्षकांनी या तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर सुरक्षारक्षक मेहूल देसाई आणि अन्य एक सुरक्षारक्षक यांना मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येऊन १५ तरुणांना अटक केली.

संपादकीय भूमिका

पॅलेस्टाईनचे समर्थन करणार्‍यांना पॅलेस्टाईनमध्ये पाठवण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !