रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. महेश चिदानंद हंप्पनावर, मु.पो. भोज, ता. निपाणी, जिल्हा बेळगाव

अ. ‘मला ‘हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केले पाहिजे’, याची जाणीव झाली.

आ. मला ‘स्वतःमध्ये किती पालट केला पाहिजे ? आणि संस्कार कसे असले पाहिजेत ?’, याविषयी पुष्कळ माहिती समजली.’

(१७.११.२०२३)

२. सौ. राजश्री अशोक काकडे, भोज, ता. चिकोडी, जिल्हा बेळगाव.

अ. ‘आश्रमात साधना करणार्‍या साधकांना पाहून मला वाटले, ‘मी काही देवतांच्या समवेत आहे.’

आ. ‘माझ्याकडून काही चूक झाल्यास प्रायश्चित्त काय घ्यायचे ? आणि साधना कशी करायची ?’, याविषयी माझ्या लक्षात आले.’

(१७.११.२०२३)

३. श्री. दीपक द. पंडीत, कांजूरमार्ग, मुंबई

अ. ‘मी आश्रम पाहिल्यानंतर ‘जागृत मंदिरात आले आहे’, असे मला वाटले. आश्रमातील सगळी रचना आणि स्वच्छता सुंदर आहे.

आ. आश्रमात सकारात्मक लहरी पुष्कळ प्रमाणात आहेत.

इ. आश्रमातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहर्‍यावर तेज आहे.

ई. सर्वांमध्ये देण्याची वृत्ती आहे.’

(४.१२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार जिज्ञासूंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक