कामावरून घरी परतणार्‍या युवकाची चोरांकडून हत्या !

प्रतिकात्मक चित्र

नवी मुंबई – वाशीतील जुहूगाव येथे बसची वाट पहात बसलेल्या एका तरुणावर दुचाकीवरून आलेल्या २ चोरांनी धारधार शस्त्राने आक्रमण केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. आक्रमणकर्त्यांनी त्याच्याजवळची बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. त्याला त्याने विरोध करताच शस्त्राने प्राणघातक आक्रमण करून त्यांनी दुचाकीवरून पलायन केले. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोपरखैरणे येथील हा युवक बारमधील काम संपवून पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाला होता. ‘फिजिक्स जिम’च्या इमारतीच्या तळमजल्यावरील ओम सिद्धिविनायक होमिओपॅथी दुकानाच्या कट्ट्यावर तो बसची वाट पहात बसला होता.