रत्नागिरी, ५ एप्रिल (जिमाका) – बेकायदेशीर कृत्ये अधिनियमानुसार ‘स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. याविषयीची २९ जानेवारी २०२४ या दिवशीची अधिसूचना केंद्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुढील ५ वर्षांसाठी ही बंदी असणार आहे.
याविषयी राज्यशासनाने सर्व जिल्हाधिकार्यांना पत्र पाठवले आहे. या कायद्याच्या प्रावधानानुसार आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी. तसेच संबंधितांवर न्यायाधिकरणाची नोटीस बजावण्याविषयीची कार्यवाही करावी. तसेच कार्यवाहीविषयी शपथपत्रे दाखल करून ती राज्यशासनाकडे जमा करण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.