पुणे – जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवराय समजून घेतांना’ या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा पिंपरी येथे झाला. या कार्यक्रमात भाजपचे नेते सुनील देवधर, भाजपच्या राज्यसभा खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी, रायगड स्मारकाचे सुधीर थोरात, ह.भ.प. संतोष महाराज काळोखे, नरेश गुप्ता, ‘सेवा सारथी संस्थे’चे पंकज दलाल, ओंकार मांडगे आदी मान्यवर आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ संस्था, हिंदु बांधव-भगिनी उपस्थित होते. देवधर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे अंतरंग समजून घेण्यासाठी तरुणांना या पुस्तकाचा उपयोग होईल. या पुस्तकाचा हिंदी, तसेच इंग्रजीमध्येही अनुवाद व्हावा.
महाराजांचे धर्मनिष्ठ धोरण प्रकाशात आणले ! – शिरीष महाराज मोरे
मागील काही वर्षे शिवरायांच्या इतिहासात असत्य गोष्टी घुसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना उत्तरे देण्याचे काम पुस्तकाद्वारे केले आहे. ऐतिहासिक कागदपत्रांचा आधार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मनिष्ठ धोरण प्रकाशात आणण्याचे काम या पुस्तकाद्वारे केले आहे.
पुस्तकाची प्रत मागवण्यासाठी ८४५९५८७११३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.