‘अध्यात्माचे ज्ञान अभ्यास करून मिळवण्यासाठी अनेक ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो. त्याच्यावर चिंतन-मनन करावे लागते. ज्या विषयाचा अभ्यास केला असेल, त्याचेच उत्तर देणे शक्य होते. या उलट साधना केल्यामुळे आपण विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याशी जोडल्यामुळे कोणत्याही विषयाचा अभ्यास करावा लागत नाही, विचार करावा लागत नाही. विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भातील ज्ञान आतून उत्स्फूर्तपणे मिळते. त्यामध्ये विषयाची मर्यादाही नसते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले