UN Kejriwal Arrest : (म्हणे) ‘निवडणुकीच्या काळात लोकांचे राजकीय आणि नागरी हक्क सुरक्षित रहातील, अशी अपेक्षा !’ – संयुक्त राष्ट्र

केजरीवाल यांच्या अटकेच्या प्रकरणी आता संयुक्त राष्ट्रांचेही विधान !

न्यूयॉर्क (अमेरिका) – भारतासह कोणत्याही देशात होणार्‍या निवडणुकीच्या काळात तेथील लोकांचे राजकीय आणि नागरी हक्क सुरक्षित रहातील, अशी आम्ही अपेक्षा करतो. तसेच प्रत्येक जण निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात मतदान करील, अशी आम्हाला आशा आहे, अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांनी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून विचारलेल्या प्रश्‍नावर व्यक्त केली आहे.

यापूर्वी केजरीवाल यांच्या अटकेवरून अमेरिका आणि जर्मनी या देशांनी चिंता व्यक्त केली होती. या दोघांनाही भारताने योग्य भाषेत समज दिलेली आहे.

संपादकीय भूमिका

‘संयुक्त राष्ट्रांनी भारतातील लोकांच्या सुरक्षेची चिंता करण्याऐवजी इस्लामी देशांत हिंदूंच्या होणार्‍या वंशसंहारावर तोंड उघडावे’, अशा शब्दांत भारताने सुनावले पाहिजे !