साधकांवर पितृवत् प्रेम करणारे सनातनचे ४२ वे (समष्टी) संत पू. अशोक पात्रीकर !

पू. अशोक पात्रीकर यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त साधकाला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यासंदर्भात आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्री. हितेश निखार

१. साधकांचे साधनेचे प्रयत्न होत नसतांना त्यांना कठोर शब्दांत जाणीव करून देणे आणि साधकांना खंत वाटल्यावर पित्याप्रमाणे प्रेमाने समजावून सांगणे अन् त्यांना व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यासाठी प्रोत्साहित करणे

‘एकदा पू. अशोक पात्रीकरकाका वर्धा येथे आले होते. त्या वेळी त्यांनी ज्या साधकांची व्यष्टी साधना होत नाही आणि ज्यांना समष्टी सेवेला वेळ देता येत नाही, अशा साधकांसाठी सत्संग घेतला. मला त्या सत्संगाला जाण्याची संधी मिळाली. पू. पात्रीकरकाकांनी सत्संगात आम्हाला व्यष्टी साधनेच्या संदर्भात काही प्रश्न विचारले. आमच्यापैकी कुणाचेच प्रयत्न होत नसल्याने आम्ही काही बोललो नाही. तेव्हा पू. काकांनी आम्हाला त्याविषयी खंत वाटत नसल्याची कठोर शब्दांत जाणीव करून दिली. त्या वेळी आम्ही त्यांची क्षमा मागितली आणि आम्ही न बोलण्याचे कारण सांगितले. पू. काकांनी आमचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि पुढच्याच क्षणी तितक्याच प्रेमाने आम्हाला व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्या वेळी आम्हाला ‘गुरुदेवांचा कृपाशीर्वादच मिळाला’, असे वाटले. आमची चूक झाल्यावर पू. काका आम्हाला रागावले आणि आम्हाला चुकीची खंत वाटल्यावर त्यांनी आम्हाला पित्याप्रमाणे प्रेमाने समजावून सांगितले. तेव्हा आमच्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.

२. पू. पात्रीकरकाकांच्या समवेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे

पू. काका जिल्ह्यात आले की, प्रत्येक साधकाची प्रेमाने विचारपूस करतात. ते सत्संग घेत असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले मार्गदर्शन करत आहेत’, असे मला जाणवते. पू. काका आमच्या घरून निघत असतांना त्यांचे माझ्या कुटुंबियांच्या समवेत छायाचित्र काढले. तो क्षण माझ्यासाठी विलक्षण होता. तेव्हा मला जाणवले, ‘जणू काही अध्यात्मातील पिता आमच्या समवेत बसला आहे आणि तो सगळ्यांचा सांभाळ करत आहे.’ तेव्हा मला पू. काकांच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉक्टर दिसत होते.’

– श्री. हितेश निखार, वर्धा (१५.३.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक