सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी (वय ९० वर्षे) यांना नामजप करत असतांना आलेली अनुभूती !

सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर

‘एकदा सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी (वय ९० वर्षे) नामजप करत होत्या. तेव्हा त्यांना पुढील दृश्य दिसले, ‘श्रीविष्णु गरुडावर बसून सद्गुरु आजींच्या निवासाच्या खोलीत आला. श्रीविष्णूला पाहिल्यावर सद्गुरु आजींनी त्याला नमस्कार केला. त्यानंतर श्रीविष्णु त्यांना बघून हसला. श्रीविष्णूने त्याचा उजवा हात सद्गुरु आजींच्या अनाहतचक्राकडे नेला. तेव्हा सद्गुरु आजींच्या अनाहतचक्रातून एक ज्योत बाहेर आली आणि ती श्रीविष्णूच्या उजव्या हातात गेली. नंतर श्रीविष्णूने ज्योत असलेला आपला उजवा हात स्वतःच्या अनाहतचक्राकडे नेला. तेव्हा ती ज्योत श्रीविष्णूच्या अनाहतचक्रामध्ये गेली.’

– श्री. मनोज कुवेलकर (सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर यांचा मुलगा (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ५५ वर्षे)), कवळे, फोंडा, गोवा. (२४.१०.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक