पू. शिवाजी वटकर यांना आलेल्या अनुभूतीप्रमाणे अनुभूती आतापर्यंत कुणालाच आलेली नाही. अशी अप्रतिम अनुभूती आल्याबद्दल पू. शिवाजी वटकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडे !
– परात्पर गुरु डॉ. आठवले |
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे, ‘‘साधना आनंदी जीवनासाठी आहे. ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना केल्यास मोक्ष म्हणजे आनंद मिळेल.’’ वर्ष २००५ मध्ये मी कार्यालयीन कामासाठी मद्रास, म्हणजे आताचे चेन्नई येथे गेल्यावर ‘सनातनचा साधक म्हणजे आनंदी जीव’ याची प्रचीती मला गुरुकृपेने आली. चेन्नई येथे साधक श्री. काशिनाथ शेट्टी अध्यात्मप्रचाराची सेवा करत होते. त्या वेळी त्यांना मी प्रथमच भेटणार होतो. ‘माझ्या संपर्कातील चेन्नई येथील व्यक्तींकडून धर्मकार्यासाठी सहकार्य आणि अर्पण मिळेल अन् नंतर श्री. काशिनाथ शेट्टी त्या लोकांच्या संपर्कात रहातील’, असा माझा हेतू होता.
१. श्री. काशिनाथ शेट्टी यांना कार्यालयात बोलावणे, कार्यालयात अनेक लोकांची वर्दळ असणे आणि ‘कार्यालयात कोणत्या अधिकार्याच्या समोर बसलेला असेन’, याविषयी ठाऊक नसल्याने त्यासंदर्भात श्री. काशिनाथ यांना सांगू न शकणे
मी नोकरी करत असलेल्या ‘शिपिंग कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ या आस्थापनाचे कार्यालय ‘मद्रास पोर्ट ट्रस्ट’ या बंदरात होते. तेथे पहिल्या माळ्यावर मोठ्या सभागृहासारख्या जागेत सर्व कर्मचारी बसले होते. तेथे जहाजावरील, तसेच स्थानिक लोकांची बरीच वर्दळ होती. मी एका अधिकार्यासमोर बसलो होतो. मी श्री. काशिनाथ यांना दुपारी १२ वाजता तेथे बोलावले होते. मी त्यांना यापूर्वी कधी पाहिले नव्हते. त्या वेळी आमच्याकडे भ्रमणभाष नव्हते, तसेच ‘त्या वेळी मी नेमका कोणत्या अधिकार्याच्या समोर बसलेला असेन ?’, याविषयी मलाच ठाऊक नव्हते. त्यामुळे मी श्री. काशिनाथ यांना त्याविषयी कळवू शकलो नाही.
२. अधिकार्याने ‘श्री. काशिनाथ यांना एवढ्या गर्दीत कसे ओळखणार ?’, असे विचारल्यावर त्यांना ‘सनातनचे साधक नेहमी आनंदी असतात’, असे सांगून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या महानतेविषयी अवगत करणे
मी ज्या अधिकार्यांसमोर बसलो होतो, त्या अधिकार्यांनी मला विचारले, ‘‘एवढ्या गर्दीत तुम्ही तुमच्या साधकाला कसे ओळखणार ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘सनातनचे साधक नेहमी आनंदी असतात. आमच्याकडे संप्रदायासारखी विशिष्ट वेशभूषा नसते; मात्र ‘चेहर्यावरील आनंद’ हीच आमच्या साधकांची ओळख आहे. आमचे गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला आनंद दिला आहे आणि आमच्याकडे आनंदाविना अन्य काही नाही.’’ माझे बोलणे ऐकून त्या अधिकार्याला आश्चर्य वाटले. प्रत्यक्षात तेथील मद्रासी लोकांच्या एवढ्या गर्दीत ‘दक्षिण भारतीय श्री. काशिनाथ यांना ओळखणे’, ही माझी परीक्षाच होती.
३. ‘श्री. काशिनाथ ठरल्याप्रमाणे दुपारी १२ वाजता कार्यालयात येतील’, याची मला निश्चिती होती. मी ११ वाजून ५५ मिनिटांपासून जिन्यातून सभागृहात येणार्या लोकांकडे पहात होतो. एक आनंदी व्यक्ती मला शांतपणे सभागृहात येतांना दिसली. त्या वेळी मी त्या अधिकार्यांना सांगितले, ‘‘हे आमचे साधक आहेत.’’
४. मी श्री. काशिनाथ यांच्याकडे जाऊन त्यांना अधिकार्याजवळ घेऊन आलो. मला सूक्ष्मातील किंवा स्पंदनांविषयी फारसे समजत नाही, तरीही गुरुकृपेने मला श्री. काशिनाथ यांना ओळखता आले. त्या अधिकार्याला याचे आश्चर्य वाटले. त्यांनी आम्हाला धर्मकार्यासाठी साहाय्य केले.
५. कृतज्ञता
‘परात्पर गुरु डॉ. आठवले आमच्याकडून ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाने साधना करून घेत आहेत आणि आम्हाला आनंद प्रदान करत आहेत. त्यांनी ‘सनातनचे साधक म्हणजे आनंदी व्यक्तीमत्त्व’ अशी जगाला ओळख करून दिली आहे’, त्याबद्दल साक्षात् श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी मी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(९.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |