ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील प्रकार !
शहापूर (जिल्हा ठाणे) – मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेला पोलीस कर्मचारी चंद्रकांत गवारे याने त्याच्या साथीदारांसह मुंबई-नाशिक महामार्गावरून जाणार्या एका टेंपोमधील ५ कोटी ४० लाख रुपये लुटून नेले. पोलीस असल्याची बतावणी करून त्यांनी हा प्रकार केला. या प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी चंद्रकांत गवारे याच्यासह १२ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेली ५० टक्के रक्कम जप्त केली आहे. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. लुटीप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. ही रोकड जळगाव येथील सोने-चांदीचा व्यापार करणार्याची आहे. चंद्रकांत गवारे याला वर्ष २०१७ मध्ये बडतर्फ करण्यात आले होते. त्या वेळी त्याने एका हिरे व्यापार्याला धाक दाखवून लुटले होते.
संपादकीय भूमिकाअशा गुन्हेगारी मनोवृत्तीच्या पोलिसाला केवळ बडतर्फ करून नव्हे, तर कारागृहात डांबणे आवश्यक आहे, हेच या घटनेतून दिसून येते ! |