नवी मुंबई, २२ मार्च (वार्ता.) – नवी मुंबई महापालिकेतील आयुक्तांसह वरिष्ठ अधिकार्यांचे स्थानांतर झाले आहे. त्यामुळे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी जाताजाता प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने प्रमुख पदांचा अतिरिक्त कार्यभार सध्या कार्यरत असलेल्या अधिकार्यांवर सोपवण्याचे आदेश काढले आहेत.
यामध्ये उपायुक्त शरद पवार यांना प्रशासनासह अतिरिक्त आयुक्त -१ यांसह अन्य विभागांचे काम सोपवले आहे. अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त-२ यांसह अन्य विभागांचे काम सोपवले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त चंद्रकांत तायडे यांच्याकडे परिमंडळ-२ यांसह विभागांचे प्रमुख म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेत यापूर्वी विविध विभागांचे प्रमुख (उपायुक्त) यांनी एका विभागासह अन्य ३ ते ४ विभागांचे काम योग्य प्रकारे सांभाळले आहे. त्यामुळे अतिरिक्त अधिकार्यांवर होणार्या खर्चात महापालिकेची बचत झाली आहे.