पालघर जिल्ह्यात कारागृह उभारण्यासाठी निधी संमत


पालघर
– राज्यात बंदीवानांची जागा अपुरी पडत असल्याने पालघर जिल्ह्यात कारागृह उभारण्यासाठी ६३० कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. उमरोळी येथील जागा मध्यवर्ती कारागृहासाठी निश्चित करण्यात आली आहे.

सध्या पालघर जिल्ह्यातील पाचशेहून अधिक बंदीवान ठाणे आणि तळोजा येथील कारागृहांत ठेवण्यात आले आहेत. सुनावणीसाठी न्यायालयात त्यांची ने-आण करण्यासाठी पोलिसांना अनुक्रमे १०० ते १५० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यासाठी पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ लागते.